Marmik
Hingoli live News

विराट लोकमंच ने मुख्यमंत्र्यांसह शासन- प्रशासनातील सर्वांनाच केला बांगड्यांचा आहेर; निषेधही नोंदविला

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शिक्षणातील भ्रष्टाचार रोखण्यास व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही न झाल्याने विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री यांच्यासह शासन प्रशासनातील सर्वांनाच बांगड्यांचा आहेर सादर करून निषेध नोंदविला.

हिंगोली शिक्षणधिकारी (प्रा) संदिपकुमार सोनटक्के,कंत्राटी कर्मचारी व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी संगनमत करून RTE कायद्याचे व शासन नियमाचे उलंघन करून अनेक अनियमित कामे केली केलेल्या अनुदानित शाळाच्या कामाची माहितीची मांगणी केली असता आदेश पारित करून 10 महिण्या पेक्षा अधिक कालावधी लोटला तरी माहिती देण्यास टाळा टाळ करीत असे करून अधिनियम 2005 व दप्तर दिरंगाई कायदा 2006 चे सर्रासपणे उलंघन करून कर्तव्यात कसूर करत अनेक अनियमित कामे करून मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचाराद्वारे चल अचल संपत्ती जमा केली. आणि शासनाचा कोट्यावधीच्या निधीचा नुकसान करणारे मुजोर प्रवृत्तीचे शिक्षण अधिकारी (प्रा. मा.) संदिपकुमार सोनटक्के, कंत्राटी कर्मचारी सह तालुका स्तरावरील शिक्षण विभागाचे दोषी अधिकारी कर्मचारी व इतरांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरु करावी या मागणीचे निवेदन देऊनही शासन व प्रशासनाद्वारे आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात येत नाही त्याचा निषेध म्हणून आज विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत तसेच ई-मेल, रजिस्टर पोस्ट द्वारे मा.मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, अपर मुख्य सचिव (शिक्षण), प्रधान सचिव शिक्षण,आयुक्त शिक्षण, संचालक शिक्षण, विभागीय शिक्षण उपसंचालक,औरंगाबाद जिल्हा परिषद प्रशासन व ईतरांना बांगडयाचे आहेर देऊन निषेध नोंदविण्यात आला .

या नंतर हि कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन सादर करून विनंती करण्यात आली या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल सह,शेख नौमान नवेद रवि जैस्वाल, शेख़ बासिद, पठान साजिद लाला,सय्यद शौक़त,शेख़ शाहनवाज़, शेख़ आवेस, पठान रऊफ़ ख़ान, पठान आलम खान,शेख़ अफ़रोज़ फेरोज, पठान कलिम,सय्यद गौस,सतीश लोनकर,मो.हाशीर फैजान, मुख़िद बाग़बान, आमेर बाग़बान,शेख शकील बागबान,जुबेर खान आदी पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Related posts

श्रीखंडोबा यात्रा महोत्सव: कोळसा येथे पार पडले कुस्त्यांचे जंगी सामने

Gajanan Jogdand

महाराष्ट्र शासन सेवेत लागलेल्या नवनियुक्त उमेदवारांचा उद्या जाहीर सत्कार

Santosh Awchar

युवा दिन : शासकीय नरसिंग महाविद्यालयात एड्स बाबत शपथ व व्याख्यानाचा कार्यक्रम

Gajanan Jogdand

Leave a Comment