Marmik
News महाराष्ट्र

शिक्षण विभागाच्या निषेधार्थ विराट लोकमंच करणार शासनाला बांगड्यांचा आहेर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – शिक्षण विभागाच्या निषेधार्थ विराज राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने 18 ऑगस्ट रोजी शासनाला बांगड्यांचा आहेर करण्यात येणार आहे.

माहिती अधिकार अधिनियम 2005 व दप्तर दिरंगाई कायदा 2006 चे सर्रासपणे उलंघन करून कर्तव्यात कसूर करत अनेक अनियमित कामे करून मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचाराद्वारे चल – अचल संपत्ती जमा करून शासनाचा कोट्यावधीच्या निधीचा नुकसान करणारे मुजोर प्रवृत्तीचे शिक्षण अधिकारी (प्रा.मा.) संदिपकुमार सोनटक्के, कंत्राटी कर्मचारीसह तालुका स्तरावरील शिक्षण विभागाचे दोषी अधिकारी कर्मचारी व इतरांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरु करावी आणि त्यांच्या चल – अचल संपत्तीची उच्च स्तरारीय चौकशी करावी अश्या मागणीचे निवेदन देऊनही शासन व प्रशासनाद्वारे आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. त्याचा निषेध म्हणून विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने उद्या दि.18 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा प्रशासनामार्फत तसेच ई-मेल,रजिस्टर पोस्ट द्वारे मा.मुख्यमंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदय, अपर मुख्य सचिव (शिक्षण), प्रधान सचिव शिक्षण,आयुक्त शिक्षण,संचालक शिक्षण, विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद जिल्हा परिषद प्रशासन व ईतरांना बांगडयाचे आहेर देऊन निषेध नोंदविण्यात येणार आहे.

या नंतर हि कार्यवाही न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जवाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी शासनाला दिला आहे.

Related posts

Hingoli जयपूर ग्रामपंचायतीचे पाऊल पडते पुढे; ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षलागवड

Gajanan Jogdand

प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करा, अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी विविध योजना राबवा, विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलची मागणी

Gajanan Jogdand

खासदार राहुल गांधी आले आणि गेले, पक्ष कार्यकर्त्यांशिवाय नागरिकांना खबर नाही!!

Gajanan Jogdand

Leave a Comment