मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलच्या वतीने 27 डिसेंबर पासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानभवनासमोर उपोषण करण्यात येणार आहे. तसेच 29 डिसेंबर रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलनही केले जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शिक्षणाची दुरावस्था, शिक्षण विभागातील भ्रष्ट्राचार, बनावटी कागदपत्रा आधारे खरेदी, अनियमीतपणे न.प.बांधकाम परवानगी व शासकीय जागेवर बडेरा दाम्पत्याव्दारे अतिक्रमण, स्वस्त धान्य दुकानदाराव्दारे लाभधारकांची पिळवणुक., शासकीय कार्यालयाद्दारे जनतेच्या हक्काचे एकमेव माहिती अधिकार संपविण्याचा कट कारस्थान इत्यादी बाबीसंदर्भात मागील दोन वर्षापासुन सतत निवेदन व पाठपुरावा करुनही शासन स्तरावरुन संबंधित विभागाद्वारे तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन व ईतर संबंधिताकडून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (NGO) हिंगोली च्या वतीने दि.27 डिसेंबर 2022 पासुन विधानभवन समोर उपोषण सुरु करुन कारवाई न झाल्यास दिं.29 डिसेंबर 2022 रोजी सामूहिक आत्मदहन आंदोलन केले जाणार आहे.
याबाबत परवानगीचे निवेदन जिल्हाधिकारी, हिंगोली व पोलीस अधीक्षक, हिंगोली मार्फत सर्वांना पाठवण्यात आलेले आहे.
या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल,राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद, जिल्हा कार्याध्यक्ष शेख बासित व ईतर आदींच्या सह्या आहेत.