सेनगाव : जगन वाढेकर
येथील एका गरीब कुटुंबातून हलाखीच्या परिस्थिती वर मात करून शिक्षण घेणारा विद्यार्थी विवेक दिलीप शेळके हा वसमत येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या प्रवेशास पात्र ठरला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत शिक्षण घेणार्या विवेकचा त्याच्याच आजोबाच्या हस्ते शाळेत सत्कार करण्यात आला. या छोटेखानी सोहळ्याने विवेकच्या आजोबाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.
सेनगाव तालुक्यातील जामदया येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विवेक दिलीप शेळके या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची त्याच्या आई-वडिलांनी कामासाठी पुणे येथे स्थलांतर केले आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील विवेक हा लहानपणापासून जिद्दी अभ्यासू प्रामाणिक आणि स्वयंशिस्त असा विद्यार्थी राहिला म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अगदी तसेच विवेकचा प्रवास सुरू आहे. विवेकने आपल्या परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आत्ता पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. विवेक हा अभ्यासात अत्यंत हुशार असा विद्यार्थी असून त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर वसमत येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी च्या प्रवेशासाठी तो पात्र ठरला आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभ्यास म्हणजे सायास, प्रयास, प्रयत्न, सराव, मेहनत, एखादी गोष्ट मिळविण्यासाठी अनुभवण्यासाठी आकलनासाठी शिकण्यासाठी पुनःपुन्हा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. कोणताही विषय कितीही कठोर, अशक्य वा असाध्य असला तरीही तो सातत्याने शिस्तबद्ध प्रयत्न करून शिकता येतो, शिकण्यासाठी केला जातो तो अभ्यास असे अभ्यासाचे वर्णन केले आहे. या वर्णनाप्रमाणे जामदया येथील विवेकच्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे. विवेकने आपल्या मेहनतीने वसमत येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशास पात्र ठरला आहे. त्याच्या या यशात महत्वाचा वाटा असणारी व्यक्ती म्हणजे त्याचे आजोबा सुभाष किसन शेळके हे होत.
13 जुलै रोजी विवेकच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने एक छोटेखानी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विवेकचा त्याच्याच आजोबाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या छोटेखानी आपल्या नातवाचा गौरव केल्याबद्दल त्याच्या आजोबांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. शाळेतील वातावरण काही वेळापर्यंत अत्यंत भावूक झाले होते. या कार्यक्रमास मुख्याध्यापक, सरपंच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.