मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी:-
- हिंगोली – जलशक्ती मंत्रालय भारत सरकार पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने हिंगोली जिल्हयातील गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. गाव स्वच्छ,शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन जितेंद्र पापळकर यांनी जल रथाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
- पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जल जीवन मिशन विषयक जन जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन,हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जल जीवन मिशन शुध्द पाण्याची उपलब्धता,
- वैयक्तीक स्वच्छता,परिसर स्वच्छता,गावाची स्वच्छता,घर व अन्न पदार्थाचे स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन,मानवी विष्टेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय) सार्वजनिक शौचालय तसेच जल जीवन मिशन च्या अनुषंगाने प्रत्येक घराला ५५ लिटर प्रमाणे पाणी, योजनेची देखभाल दुरुस्ती, गाव हर जल घर करणे, तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या बाबत जलरथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
- या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली संजय देने, जिल्हा माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, ग्रामीण पाणी पुरवठा प्रीती माकोडे, प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आत्माराम बोंद्रे, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष तज्ञ, सर्व इतर विभागाचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
- जलरथाच्या माध्यमातून जिल्हयात स्वच्छ भारत मिशन, टप्पा-2 व जल जीवन मिशन च्या विविधि घटकांची व जलयुक्त शिवार याबाबत प्रचार प्रसिध्दी होणार असून सर्व सामान्य नागरिकापर्यंत योजनां ची माहीती देऊन जन जागृती होण्यास मदत होणार असल्याचे आत्माराम बोंद्रे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग यांनी सांगितले.