विशेष प्रतिनिधी
मुलांमधील कुपोषण, लठ्ठपणा आणि त्यांच्यातील अंधत्वाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य शासनाने शालेय पोषण आहारातून मुलांना अंडी देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला; मात्र सदरील निर्णयाने शासनाला महाराष्ट्र काय मांसाहारी बनवायचा आहे का? असा प्रश्न काही सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत. तो नक्कीच बुद्धीला न पटणारा आहे… आणि बालकांना कुपोषित ठेवणारा आहे…
राज्यातील सर्वच शालेय मुलांना पोषक आणि संतुलित आहार मिळतोच असे नाही. याची कारणे सामाजिक आणि सामाजिक – आर्थिक स्तरावर आपल्याला दिसून येतील.. यातील पहिले सामाजिक कारण म्हणजे ‘शुद्ध’ शाकाहारी हे होय. आणि दुसरे हे इतर अनेक बहुतांश होत..
आता कोणी म्हणेल की किंवा अनेक जण म्हणतील की आम्हीही ‘शुद्ध’ शाकाहारी आहोत. त्यांची ही बाब नक्कीच कौतुकास्पद. मात्र इतरांचे काय? दिखाव्यासाठी काहीही करता येत नाही.. अशा शुद्ध शाकाहारींना दूध हे मांसाहार आहे हे यांच्या गावीही नसते.. मग हे उपवासालाही दुधाचा चहा घेतात… अज्ञानातून हे असे घडते.
जिल्हा परिषदांच्या शाळांचे खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर जनतेची तळमळ असलेल्या विद्यमान सरकारने भारताचे उद्याचे भविष्य असलेल्या शालेय मुलांच्या दृष्टीने शालेय पोषण आहारात कमी किमतीत मिळणाऱ्या आणि आवश्यक पोषण तत्वे असणाऱ्या अंड्यांचा समावेश असावा असा निर्णय घेतला. यातून विद्यमान सरकार हे तळागाळातील जनतेची किती पोटतिडकीने सेवा करते, हे उघड उघड दिसते.
परंतु हा निर्णय लागू होतो न होतो तोच राज्यातील काही सामाजिक संस्थांनी सदरील निर्णय हा अहितकारी, मतभेद निर्माण करणारा आणि राज्य मांसाहारी करणारा आहे म्हणून विरोध दर्शविला आहे तो कोणाही सदसद विवेक बुद्धी असलेल्या व्यक्तीला पटणारा नाही.
आहारात दररोज किमान दोन अंडी असावीत, असा सल्ला बहुतांश सर्वच तज्ञ देतात. त्याचे कारणही तसेच वैज्ञानिक आहे. अंड्यांमुळे ज्यांची हाडे कमकुवत असतात अशांची हाडे मजबूत बनतात. हाडांची योग्य प्रकारे योग्य वेळी वाढ होते. हाडे झिजण्यापासून बचाव होतो.
तसेच डोळ्यांची नजर तेज बनते. डोळ्यांमधून सर्व घाण बाहेर पडते. अंड्यांमध्ये नऊ ॲनिमो ऍसिड आहेत. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत विटामिन ए, बी, बी12 आणि व्हिटॅमिन डी, ई हे अंड्यामध्ये आहेत.
शरीराला ज्याची आवश्यकता आहे असे फायदेशीर ऍसिड अंड्यामध्ये आहे. अंड्यामध्ये अँटिऑक्सिडेंट ल्युटीन आणि जिंजेथिन आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांवर पडणारे अतिनील किरण नष्ट करते.
अंडी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते. तसेच भूक कमी लागते आणि जेवण योग्य प्रमाणात राहते. त्यामुळे आपले वजन संतुलित राहते. तसेच इतर अनेक फायदे अंडी खाण्याचे आहेत. तोटे मात्र त्या प्रमाणात नगण्य असे आहेत.
असा संतुलित आहार शासनाने आठवड्यातून बुधवार किंवा शुक्रवार या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना द्यावा असा निर्णय घेतला. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आहारात दररोज किमान दोन अंडी असावीत.
मात्र शासन कुपोषण दूर करण्यासाठी आठवड्यातून केवळ एकच दिवस विद्यार्थ्यांना अंडी खाऊ घालणार… हेही नसावे कमी असे म्हणून आपण हे मान्य केले मग अशा या आहारास विरोध का? शासनाकडून मिळणारा हा आहार नाकारण्याचा प्रत्येकास अधिकार असायला हवा आणि तो आहे… ज्यांना या आहाराची गरज आहे ते विद्यार्थी हा आहार घेतील..
आणि राहता राहिला प्रश्न अंड्यांच्या गुणवत्तेचा तो शासनाने लक्षात घ्यावा. बाकी तज्ञांच्या मते काही लोकांना अंड्यांची एलर्जी असू शकते. लहान मुलांमध्ये अंड्यांपासून एलर्जी होणे हे सामान्य आहे. मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांना अंड्यांपासून होणारी एलर्जी देखील संपते असे तज्ञांची मते असून अंड्यांपासून एलर्जी झाल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब, तोंडाभोवती सूज येणे, अशा समस्या देखील उद्भवतात, असे त्यांचे म्हणणे आहे….