मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान कळमनुरी तालुक्यातील वारंगा वन पर्यटन येथे वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांना वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताह निमित्त विभागीय वन अधिकारी गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून कळमनुरी तालुक्यातील वारंगा वन पर्यटन येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी वन्यजीवांच्या संरक्षण आणि नैसर्गिक अधिवासाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या सप्ताह निमित्त विविध जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात आले. जांभरून येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
यावेळी हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्यासह वनरक्षक तसेच वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहास विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थांतून चांगला प्रतिसाद मिळाला.