साप्ताहिकी : विशाल वसंतराव मुळे-आजेगावकर
सामान्य माणसं मानतात. त्यांच्या ह्या संघर्षाच्या काळात साथदेनार्या पैकी एक असलेल्या अमित शाह ह्यांनी तो संघर्ष फार जवळून पाहीला आणि त्या वेळेस मोदींनी काय काय सहन केलं ह्याचा पाढाच त्यांनी वाचला. त्या विषयाची दाहकता लक्षात घेता, ह्यांना न्यायालयाने मोकळ केलं तेंव्हा मोठ्या मनाने ह्या सर्वांनी त्यांची माफी मागावी तितक्याच मोठ्या अंतकरणाने मोदी माफ करतीलही…
जाकिया जाफरी ह्यांच्या याचिकेवर सुप्रिय कोर्टाने क्लिनचिट दिली आहे. गोध्राकांडाने मोदींवर प्रचंड आघात केला, तो त्या माणसाने सहन केला. अतिशय संयमाने त्यांनी ह्या सर्व प्रकाराला आपल्या संयमाने आपल्या कामाने, आपल्या समर्पनाने दाखऊन दिले. 2002 च्या त्या गोध्राकांडानंतर गुजरातसारख्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपला प्रवास सुरु केला. तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी “राजधर्म” चा उपदेश केला. मोदिंनी त्या उपदेशाच तंतोतंत पालन केलं. वाजपेयींना आपल्या गुरुस्थानी माणलेल्या मोदिंनी त्यांच्या प्रत्येक विचाराला सल्ला माणुन गुजरातची पंधरावर्ष सेवा केली. गुजरात देशातल सूजलाम सूफलाम राज्य गणल्या जाऊ लागल. मी स्वतः ते प्रधानमंत्री होण्या अगोदर आणि आताही गुजरातला अनेकवेळा गेलो, तिथला व्यापारीवर्ग, शेतकरीवर्ग, तरुणाईला आपल्या नेत्यावर पुर्ण विश्वास असलेला दिसला. एकिकडे मोदी विकासाच्या मार्गावर चालत होते, तर दुसरीकडे कम्युनिस्ट, समाजवादी, कॉंग्रेसी, काही संस्था त्यांच्यावर विषारी प्रहार करायच्या, मोदी ते प्रहार देखील अतिशय शांतपणे प्राशन करायचे.. एक काळ तर असा होता की मोदी मुख्यमंत्री असतांना गुजरातमधील बहुतेक पत्रकार वर्ग हा त्यांच्या विरोधात गेला होता. पण मुख्यमंत्री असुनही मोदिंनी त्यांना कधिच त्रास होईल असी स्थिती निर्माण केली नाही. केंद्राच्या मनमोहनसिंह सरकारचा फायदा घेत केंद्र सरकारने एस.आय.टि.ची स्थापना केली. मोदी त्याच्याही समोर गेले, अगदी बारा- पंधरा तास त्यांच्याशी चर्चा केली. ही सरबती अनेक दिवस चालली. पण ना मोदींनी त्याचा सोहळा केला, ना पत्रकार परीषद कधी घेतली. मोदी घटनेचे खुप मोठे जानकार आहेत, इतकच नाही तर मोदी हे राजधर्म आणि घटना ह्यावर विश्वास ठेऊनच सर्व करतात…
एकिकडे मोदी स्वतःच्या प्रामाणिक कामावर लक्ष केंद्रीत करित होते, त्यांच्या राज्याचा प्रमुख म्हणुन विकासाचा धडाका लावत होते. तर त्यांची वैचारीक विरोधक मंडळी त्यांच्या अतिशय निच दर्जाचे आरोप करीत होते. त्या आरोपाला उत्तर मोदी त्यांच्या कार्यातून देत होते. अशातच एक बातमी येते की एस.आय.टि. चे अध्यक्ष मोदींना न अडकऊ शकल्याने त्यांच्यावर कॉंग्रेस नेत्यांनी राग काढला, त्यांनी हे त्यांच मत त्यांच्या जिवनचरित्रात देखील लिहिलं आहे. एक व्यक्ती हा आपल्या कामाप्रती, राजधर्माप्रती, आपल्या धर्माप्रती प्रामाणिक असल्याचा त्रास त्यांच्या विरोधकांना होत होता म्हणुन शक्य त्या वेळी मोदींची बदनामी करायला तो विरोधी कमी पडले नाही. केंद्रीय सत्तेचा दुरुपयोग करुन मोदीला बदनाम करत होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीने तर मोदिला “मौत का सौदागर” अशा खालच्या आणि त्यांना ह्या शब्दाचा अर्थ माहित नसलेल्या शब्दात संभावना केली आहे. मोदिंनी तीही संयमाने सहन केली. आपल्या सारख्या सामान्य माणसांना संवैधानिक बाबी तितक्याशा माहीती नसतात. पण मोदीच्या प्रत्येक वागन्याने त्यांनी न्यायालयाला सहकार्य केले. आणि त्यांचे उत्तर आज न्यायालयाने दिले आहे! 2002 पासून आजतागायत मोदींनी केवळ हे हलाहल सहन केले आहे. आज पर्यंत त्यांच्यावर ज्या टिका केल्या, त्यांना छळल ह्या सर्वावर आता न्यायालयाने आपले मत प्रगट केले आहे. आता ही सर्व मंडळी मोदिंची माफी मागणार का?
कोणत्याही संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती नेहमीच आपल्या राजधर्माच पालन करत असतो, पण ते पालन करतांना तो एक व्यक्ती असतो हे मिडिया – माध्यमं आणि कोणतेही विरोधक विसरतात. केंद्रीयस्तरावरुन आपल्या राजकारनाची सुरुवात करणारे मोदी हे तप, साधना, संवाद, संयम, कृती, समर्पन ह्या मुल्याचे पालन करुनच पुढे आलेत. कोनताही व्यक्ती मोदीं बद्दल वाईट बोलनार नाही, कोणताही व्यक्ती त्यांच्या समर्पनभाव आणि चारित्र ह्या विषयावर संशय घेणार नाही, कोणताही व्यक्ती त्यांच्या देशप्रेमावर संशय घेणार नाही तरीही ज्या एजंसी व जी काही राजकिय मंडळी मोदिंना राजकियदृष्ट्या संपवन्यासाठी ह्या चाली खेळत होते त्यांना माननीय न्यायालयाने खुप मोठी चपराख दिली आहे. राष्ट्रप्रथम ह्या धोरणाने चालनारी त्यांची भाजपा आणि एक योगी म्हणून पाहनारी त्यांच्यावर प्रेम करनारी जनता ह्या बळाने त्यांना केंव्हाच ह्या निर्णयातून मुक्त केल जरी असलं तरी आज अधिकृत न्यायालयाने केलेल्या भाष्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना देखील एकप्रकारे क्लिनचित मिळाली असं म्हणता येईल.
डावे, कम्युनिस्ट, कॉंग्रेस, काही संस्था ह्यांना ह्यात जास्त रस का वाटला तर मोदी नावाची शक्ती त्यांच्यात असलेला संयम आणि त्यांची आपल्या कार्याप्रती असलेली निष्ठा, देशभक्ती ह्यांनी ओतप्रोत असलेल व्यक्तिमत्व हे जगावर हावी होईल, जग अशा माणसाची दखल घेतं, आणि गूजरातचाच गांधी आणि पटेल हे त्यांचे आदर्श आहेत तेंव्हा ह्यांना आत्ताच थांबवलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल. माझी डाव्यांशी मतभिन्नता जरी असली तरी ते माणसं मात्र चांगलीच ओळखतात ह्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मोदी कोनत्याही प्रकारे खचले पाहिजेत हा डाव त्यांनी आखला आणि हा सर्व बेबनाव निर्मान केला. त्यात अटलबिहारी वाजपेयी ह्यांच “राजधर्माच पालन” हे वाक्य अतिशय ट्विस्ट करुन मिडिया, डाव्यांची कम्युनीष्ट ह्यांच्या इकोसिस्टम ह्यांनी वापरले. मोदी मुळातच संघर्षशिल व्यक्तीत्व असल्याने त्यांना संघर्ष ह्याला करायला मिळाला, देशभरात ज्या गोध्राने त्याच्या अपप्रचाराने विरोधकांनी मोदींवर संधान करन्याचा प्रयत्न केला त्याच संघर्षाला आणि त्या विखारी विरोधाने मोदी भारतातल्या राष्ट्रभक्त माणसांच्या हृदयसिंहासनावर राज्यकर्ते झाले. त्या गोध्रासंघर्षाने त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक नविन झळाली मिळाली. मोदी प्रादेशीक वरुन राष्ट्रीय होण्यास त्यांचे हिन्दुत्व, विकासाचे मॉडेल, ध्येय, आध्यात्म, त्याग, समर्पन, सूस्पष्टता, हे सर्वांचा साथ सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास हे जसे कारणीभूत आहेत तसाच एक बिंदू जो की गोध्राकांड हे ही त्यात महत्वाचा बिंदू सामान्य माणसं मानतात. त्यांच्या ह्या संघर्षाच्या काळात साथदेनार्या पैकी एक असलेल्या अमित शाह ह्यांनी तो संघर्ष फार जवळून पाहीला आणि त्या वेळेस मोदींनी काय काय सहन केलं ह्याचा पाढाच त्यांनी वाचला. त्या विषयाची दाहकता लक्षात घेता, ह्यांना न्यायालयाने मोकळ केलं तेंव्हा मोठ्या मनाने ह्या सर्वांनी त्यांची माफी मागावी तितक्याच मोठ्या अंतकरणाने मोदी माफ करतीलही…
(वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही – संतोष अवचार, मुख्य व्यवस्थापक, मार्मिक महाराष्ट्र समूह, हिंगोली.)