Marmik
Hingoli live

आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नाने तामटी तांडा व पिंपळा ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – राज्याचे मुख्यमंत्री एकना शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर गोरगरीब, तळागाळातील शेतकऱ्यांसाठी घेत असलेल्या कल्याणकारी निर्णयाने जनमानसात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या प्रयत्नाने मौजे तामटी तांडा व मौजे पिंपळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध होऊन तामटी तांडा सरपंच पदी शिवकन्या जाधव यांची तर मौजे पिंपळा येथे सरपंच पदी अनुसयाबाई पोले यांची बिनविरोध निवड झाली आणि दोन्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला.

तामटी तांडा ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून शेषाबाई राठोड, सुरेख जाधव, विशाल जाधव, प्रीतीताई जाधव, कमल जाधव, अनिल राठोड, रमेश राठोड यांची बिनविरोध निवड झाली तर मौजे पिंपळा येथे ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून अनुसयाबाई जाधव तर सदस्य म्हणून भागाबाई पोले, वंदनाबाई पोले, संजय पोले, रंगनाथ कराळे, सविता कराळे, आशिष पोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही ग्रामपंचायत वर शिंदे गटाचा भगवा डौलाने फडकवुन विजय प्राप्त केल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा आमदार संतोष (दादा) बांगर यांनी हिंगोली येथे जंगी सत्कार केला.

यावेळी सुभाषराव बांगर, जि प समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, सुरेंद्र ढाले, विलास पोले, गजानन पोले, बाळू मार्कड, आकाश पोले, कल्याण पोले, दिनकर पोले, संतोष पोले, साहेबराव पोले, सुरेश पोले, सोपान पोले, सुनील नवले, ऋषिकेश पोले, मारोतराव पोले, गणेश पोले, राजू पोले, परमेश्वर मार्कड,रुस्तुम जाधव,प्रकाश जाधव,बबन राठोड,प्रेमदास जाधव,बाळू जाधव,प्रेमदास पवार, व मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.

Related posts

इयत्ता 10 वी परीक्षा: इंग्रजी विषयात 5 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले; भरारी पथकाकडून कारवाई

Santosh Awchar

… अन्यथा अन्न व्यवसायिकां वर कारवाई करण्यात येईल

Santosh Awchar

भानखेडा येथील विठ्ठल-रुक्मिणीचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Gajanan Jogdand

Leave a Comment