मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हाभरात 9 ऑगस्ट हा दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हिंगोली येथे आदिवासी समाज बांधवांनी भव्य मोटार सायकल रॅली काढून मनिपुर घटनेचा निषेध नोंदवला.
हिंगोली येथे आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा मुंडा येथे अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावातील आदिवासी समाज बांधव हिंगोली येथील गांधी चौकात एकत्र आले.
जमलेल्या आदिवासी समाज बांधवांनी मोटार सायकल रॅली काढून मणिपूर घटनेचा निषेध नोंदवला. तसेच घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती.
या दिनाचे औचित्य साधून आदिवासी कर्मचारी संघटनेच्या वतीने हिंगोली शहरातील विशाल मंगल कार्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यास स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करणारे परभणी येथील विठ्ठल कांगणे उपस्थित होते त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. संतोष टारफे हे होते तर कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग प्रमुख छंदक लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास दत्ता नांदे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, मधुकर कुरुडे, सदाशिव जटाळे, बेले, ठाकरे, एमजीएम व्यवस्थापक ठाकरे, मंडळाधिकारी रंगनाथ सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव कपाटे, जीवन बर्गे, बिरू आसोले, नंदू वाईकर, नंदू कोकाटे, अशोक खोकले, सुभाष पाचपुते, दशरथ ठाकरे, सुभाष भुरके, पंढरीनाथ चिभडे, शेषराव बुरकुले, कैलास बेले, ज्ञानोजी शेळके, तांबारे, बेले, निळकंठ, ठोके, वानोळे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक अंध आदिवासी कर्मचारी संघटना व आदिवासी युवक कल्याण संघ पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.