मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / सतीश खिल्लारी :-
सेनगाव – येथील पंचायत समिती कार्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला ग्रामसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम हिंगोली जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात जिल्हा परिषद हिंगोली चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे व सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांच्या हस्ते तालुक्यातील महिला ग्रामसेवकांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव कोकाटे, विस्तार अधिकारी जारे, देशमुख यांच्यासह बाळासाहेब देशमुख जिल्हा माहिती शिक्षण संवाद तज्ञ एस. एस. म्हस्के, अमोल देशपांडे लेखाधिकारी, तसेच सेनगाव पंचायत समिती मधील ग्रामसेवक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.