मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कालावधीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांचे वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. 22 सप्टेंबर, 2022 रोजी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,हिंगोली यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे युवती सक्षमीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे हे होते. तर यावेळी जॉएन्ट्स ग्रुपचे रत्नाकर महाजन व प्रा.मयुरी पांचाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या युवती सक्षमीकरण कार्यक्रमासाठी हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहातील व शहरातील महाविद्यालयीन 450 ते 500 विद्यार्थींनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी उपस्थित युवतींना सखोल मार्गदर्शन करुन युवतींच्या सक्षमीकरणाबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.